कोंढवा, कोथरूड पोलीस स्टेशनला प्राप्त तक्रार सामाजिक सुरक्षा विभागला पोच होत नाही काय.?

सामाजिक सुरक्षा विभाग यांनी दिलेल्या दोन्ही निवेदन मधील माहितीची पडताळणी करावी

वर्तमान टाईम्स | वृत्तसेवा:- सामाजिक सुरक्षा विभाग, पुणे शहर जुगार अड्डयावर छापा टाकुन २६ इसमावर कारवाई करून ०१,०३,९१०/- रू. किचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पुणे शहरामध्ये मागिल काही महिन्यांपूर्वी सामाजिक सुरक्षा विभागचाच बोलबाला होता परंतु मोजक्याच किंवा खात्रीशीर बातमी प्राप्त होईपर्यंत पुणे शहरातील सर्व अवैध्य धंदे राजरोस सुरू राहणार आहे काय.? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

सामाजिक सुरक्षा विभाग यांना आपल्या एका बातमीदार मार्फतीने खात्रीशीर बातमी मिळाली कि एका पत्र्याच्या शेडमध्ये काही व्यक्ती बेकायदेशीरपणे जुगार खेळत व खेळवत आहेत प्राप्त माहितीनुसार गुन्हे शाखेकडील अधिकारी व पोलीस अमंलदार यांनी गोपनियरित्या पाळत ठेवुन छापा टाकला असता, काही इसम बेकायदेशीर पैसे लावुन जुगार खेळत व खेळवत असल्याचे मिळुन आल्याने २५ इसमांना ताब्यात घेवुन त्यांचे कडून रोख रक्कम, मोबाईल व जुगाराचे साहित्य असा एकुण ०१,०३,९१० /- रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

प्रकरणी जुगार खेळताना मिळुन आलेले इसम व एक पाहिजे आरोपी अशा २६ इसमांविरूध्द मुंढवा पोलीस स्टेशन येथे गुरनं. ०४ /२०२३, महाराष्ट्र जुगार बंदी अधिनियम कलम १२ (अ) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असुन, त्यांना पुढील कारवाई करीता मुंढवा पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.

सा.सू.वि.कडून ठोक कारवाई करत असल्यामुळे अवैध्य धंदेवाईक व हप्तेखोर भ्रष्ट अधिकारी, कर्मचारी यांनी धास्ती घेतली होती परंतू आजचे चित्र बदलेले आहे याचे जिवंत उदाहरण म्हणजे कोंढवा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये अवैध्य धंदेवाईक यांचा कहर सुरू आहे याविरुद्ध पोलीस स्टेशन दाद देत नसले कारणाने रिपाई श्रमिक ब्रिगेड पुणे जिल्हा उपाध्यक्ष मंगेशभाऊ सोनावणे यांनी मा. सह्हाय्यक पोलिस आयुक्त सो. यांना तक्रार दाखल केली आहे व दिलेल्या तक्रारी बाबत प्रसारमाध्यमांकडून बातमीही प्रसिद्ध झाली होती. परंतू जबाबदार अधिकारी काही हितसंबंध जपत असले कारणाने कारवाई करत नाही अशी चर्चा सुरू आहे.

तर दुसरीकडे कार्यकर्ते मा.दशरथ मोरे यांनी कोथरूड पोलीस स्टेशन येथे स्वतः पोलीस निरीक्षक साहेब यांच्या दरबारी कोथरूड परिसरातील सर्व अवैध्य धंदेबाबत पत्यासहित तक्रार दाखल करूनही आजरोजी सर्व अवैध्य धंदे राजरोसपणे सुरू आहेत. या सर्व तक्रारी निवेदन पोलीस स्टेशन, सहाय्यक पोलीस आयुक्त सो. यांना मिळते परंतू याची माहिती किंवा तक्रार प्रत सामाजिक सुरक्षा विभाग यांना मिळत नाही का?  सामाजिक सुरक्षा विभागाने आपला स्वतःचा संपर्क क्रमांक नागरिकांसाठी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी होत आहे.

 

Exit mobile version