कर्वेनगरच्या गुटखा तस्कराला शिवाजीनगर पोलीसांनी केले जेरबंद..!!

वर्तमान टाईम्स | वृत्तसेवा:- शिवाजीनगर पोलीस ठाणे हद्दीत सहा. पोलीस निरीक्षक भोलेनाथ अहिवळे हे त्यांचे स्टाफसह पेट्रोलिंग करीत असताना पोलिस हवालदार रणजित फडतरे यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, ज्ञानेश्वर पादुका चौक, एफ सी रोड, शिवाजीनगर येथे एक पांढ-या रंगाचा छोटा हत्ती टेम्पो गाडीमध्ये गुटखा घेवुन वाहतुकीकरीता येत आहे.

मिळालेली माहिती मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. अरविंद माने शिवाजीनगर पोलीस ठाणे यांना कळवून, त्यांच्या आदेशानुसार तपास पथकातील अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक भोलेनाथ अहिवळे हे स्टाफसह ज्ञानेश्वर पादुका चौक, एफ सी रोड, शिवाजीनगर येथे रवाना होवुन तेथे सापळा रचुन मिळालेल्या माहितीच्या वर्णनाचा टेम्पो मिळुन आला टेम्पोचालक गुटखा तस्कर ज्ञानेश्वर दादासाहेब जगताप वय २८ वर्ष, राहणार वडारवस्ती, लेन नंबर ७, साईबाबा मंदिराजवळ, कर्वेनगर यास टेम्पोसह ताब्यात घेण्यात आले त्याचेकडे अधिक चौकशी करता त्याने टेम्पोमध्ये प्रतिबंधीत गुटखा हा विक्रीकरीता घेवुन जात असल्याचे सांगितले.

टेम्पोचालक ज्ञानेश्वर दादासाहेब जगताप याने महाराष्ट्र राज्याचे अन्न सुरक्षा आयुक्त यांनी त्यांचे प्रतिबंधीत आदेश क्रमांक असुमाका/ अधिसुचना / ५२४ / ०७ दिनांक १५/०७/२०२२ नुसार महाराष्ट्र राज्यात गुटखा, पान मसाला किंवा अंतिमतः गुटखा किंवा पान मसाला गठीत होऊ शकेल असा पदार्थ सुगंधीत किंवा स्वादीष्ठ सुपारी/ तंबाखू इत्यादीचे उत्पादन / साठा / वितरण / वाहतुक तसेच विक्री यावर बंदी घातली आहे. त्यांनी उक्त आदेशाचे उल्लंघन केले आहे. व विना परवाना प्रतिबंधित अन्न पदार्थाची विक्री करण्याचे उद्देशाने तसेच वाहतुक करताना मिळून आल्याने त्याच्या विरुद्ध शिवाजीनगर पोलिस ठाणे पुणे शहर येथे गुन्हा रजिस्टर नंबर ३४ / २०२३ भा.दं.वि. कलम १८८, २७२,२७३,३२८ व अन्न सुरक्षा मानके कायदा २००६ चे कलम ३० (२) (अ), ३१ २६ (२) (I) २६ (२) (IV) अन्नसुरक्षा मानदे कायदा प्रोव्हिबिशन अॅन्ड रिस्ट्रीक्शन ऑन सेल नियमन २०११ चे नियमन २.३.४ चे उल्लंघन केले आहे. तर आरोपीकडुन दाखल गुन्हयाचे पुरावेकामी ३८,८९६/- रुपये किं चा प्रतिबंधीत विमल पान मसाला गुटखा आणि २,५०,०००/- रुपये किंचा एक छोटा हत्ती टेम्पो असा एकुण २,८८,८९६/- किंमतीचा मुददेमाल ताब्यात घेण्यात आला आहे.

सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे शहर, राजेंद्र डहाळे, मा. पोलीस उपायुक्त परि-०१, पुणे शहर, सन्दीपसिंह गिल्ल, मा. सहा. पोलीस आयुक्त विश्रामबाग विभाग, पुणे शहर श्री नारायण शिरगावकर, तसेच शिवाजीनगर पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री अरविंद माने यांचे मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विक्रम गौड, सहा. पोलीस निरीक्षक भोलेनाथ अहिवळे, पोलीस अंमलदार रणजित फडतरे, बशीर सय्यद, गणपत वाळकोळी, अविनाश भिवरे, प्रविण राजपुत, अतुल साठे यांनी केलेली आहे.

Exit mobile version