एक वर्षापासुन फरार गांजा तस्कर अंमली पदार्थ विरोधी पथक १, गुन्हे शाखा कडून जेरबंद..!

३३,४१,९००/- रुपये चा ऐवजामध्ये १२८ किलो ७६५ ग्रॅम गांजा जप्त..!

वर्तमान टाईम्स | वृत्तसेवा:- गांज्या तस्कर आरोपी कैलास साहेबराव पवार,  वय ३५ वर्षे, याला रा. गट नंबर ३६६ गडदेवस्ती डोंगरगाव,पेरणे, वाडेबोल्हाई रोड येथील राहते घरातुन व चारचाकी गाडीतुन एकुण ३३,४१,९००/- रुपये चा ऐवज त्यामध्ये १२८ किलो ७६५ ग्रॅम गांजा, हा अंमली पदार्थ किं.रु. २५,७५,३००/- रोख रुपये ५०,६००/- एक मोबाईल फोन कि रु १५,०००/- चा एक चारचाकी गाडीतुन कि. रु७,००,०००/- असा अंमली पदार्थ व ऐवज मिळुन आल्याने जप्त करण्यात आला होता. त्यानुसार त्याचे विरुध्द लोणीकंद पोलीस ठाणे ४९/२०२२ एन. डी. पी. एस. अॅक्ट कलम ८ (क), २० ( ब ) ii (क) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

गुन्हयामध्ये आरोपी कैलास पवार याचेकडे मिळुन आलेल्या १२८ किलो ७६५ ग्रॅम गांजा बाबत कौशल्यपुर्ण तपास करता तो त्याने अहमदनगर येथील किशोर किसनराव जेजुरकर  रा,केडगाव,अहमदनगर याचेकडुन विक्री करीता आणला असल्याचे तपासात निष्पन्न झाले होते.

त्याअनुषंगाने अहमदनगर येथे जावुन किशोर जेजुरकर याचा शोध घेतला असता तो फरार झाला होता, अंमली पदार्थ विरोधी पथक १ कडील पोलीस अंमलदार योगेश मोहिते यांना त्यांचे बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, लोणीकंद पोलीस ठाणे गु.र.नं. ४९/२०२२ एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ (क), २०(ब).ii ( क ), मधिल पाहिजे आरोपी किशोर किसनराव जेजुरकर हा त्याचे रहाते घरी केडगाव येथे आला आहे. हि माहिती त्यांनी पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांना कळवुन मिळालेल्या माहिती नुसार केडगाव, अहमदनगर लोढेमळा येथे बातमीतील ठिकाणी पोहचल्यानंतर आरोपीचे घराभोवती सापळा रचुन अत्यंत शिताफीने त्यास ताब्यात घेतले आहे.

वरील कारवाई ही मा.पोलीस आयुक्त, पुणे शहर, श्री. रितेश कुमार, मा. पोलीस सह आयुक्त,पुणे आयुक्त श्री. संदिप कर्णिक, मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, श्री. रामनाथ पोकळे, मा. पोलीस उप आयुक्त, गुन्हे, श्री. अमोल झेंडे, मा. सहा पो आयुक्त गुन्हे १, श्री गजानन टोम्पे यांचे मार्गदर्शना खाली अंमली पदार्थ विरोधी पथक, १ गुन्हे शाखा पुणे शहर कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विनायक गायकवाड, सहा पोलीस निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे, शैलजा जानकर, पोलीस अंमलदार योगेश मोहिते, मनोजकुमार साळुंके, विशाल शिंदे, विशाल दळवी, मारुती पारधी, ज्ञानेश्वर घोरपडे, राहुल जोशी, संदिप शिर्के, प्रविण उत्तेकर, पांडुरंग पवार, सचिन माळवे, संदेश काकडे, रेहाना शेख, नितेश जाधव यांनी केली आहे.

Exit mobile version