एकाच वेळी दोन ठिकाणी छापा टाकुन ११,२२,५००/- रुपये किं. चा गांजा व अफिम जप्त..!!

०३ आरोपींना केले जेरबंद..!

वर्तमान टाईम्स | वृत्तसेवा :- अंमली पदार्थ विरोधी पथक ०१ कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री विनायक गायकवाड, सहा पोलीस निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे व स्टाफ हडपसर येथे पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अंमलदार, विशाल दळवी यांना महिती मिळाली की, एक महिला व सोबत एक व्यक्ती हे पुणे हडपसर गाडीतळ, सिध्देश्वर पेट्रोलपंपा समोरील सार्वजनिक रोड जवळ गांजा विक्री करीता वाहतुक करीत आहेत.

मिळालेल्या बातमीनुसार अंमली पदार्थ विरोधी पथक १ यांनी बातमीच्या ठिकाणी जावुन छापा कारवाई केली असता एक महिला, वय – ४५ वर्षे हिच्या ताब्यातून किं.रु.२,६६,६००/- कि.चा १३ किलो ३३० ग्रॅम गांजा व आरोपी लक्ष्मण गवनेर काळे, वय ५५ वर्षे याचे ताब्यातुन किं.रु. २,५६,४००/- चा १२ किलो ८२० ग्रॅम गांजा असा एकुण ५,२३,०००/- रू कि.चा २६ किलो १५० ग्रॅम गांजा १०,०००/- रु किंमतीचा मोबाईल व ईतर असा एकुण ५,३७,५००/- रु कि.चा जप्त केला आहे.

तसेच दुसरीकडे अंमली पदार्थ विरोधी पथक ०१ कडील सहा. पोलीस निरीक्षक, शैलजा जानकर व अंमली पदार्थ विरोधी पथक-०१ हे मार्केटयार्ड पोलीस स्टेशनचे हद्दीमध्ये पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अंमलदार, पांडुरंग पवार, सचिन माळवे यांना त्यांचे बातमीदारामार्फत माहिती मिळाली की एक व्यक्ती हा मार्केट यार्ड येथील मार्केट यार्ड लेन नंबर ०३ गणेश मंदिरा समोर जे के ट्रेडींग कंपनीचे बाजुला सार्वजनिक रोडवर अफिम विक्री करीता येणार आहे माहिती मिळताच माहितीच्या ठिकाणी अंमली पदार्थ विरोधी पथक १ कडील स्टाफ यांनी जावुन छापा टाकुन आरोपी तुलछाराम गीगाराम चौधरी, वय – ३९ वर्षे रा. याच्या ताब्यातुन ५,८५,०००/- रु कि.चा ऐवज त्यामध्ये २५० ग्रॅम आफिम ५००,०००/- रु किचा, तसेच १५,०००/- रु किंचे दोन मोबाईल फोन ५०,०००/- रु किंची एक सुझुकी अॅक्सेस गाडी, रोख रुपये जप्त केला असुन मार्केट यार्ड पोलीस स्टेशन गु.र.नं. १७१ / २०२३. एन. डी. पी. एस. अॅक्ट कलम ८ (क), १७ (ब) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

वरील नमुद कारवाई ही मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर, श्री रितेश कुमार, मा. पोलीस सह आयुक्त, पुणे शहर श्री. संदिप कर्णिक, मा. अपर पोलीस आयुक्त गुन्हे पुणे शहर श्री रामनाथ पोकळे, मा. पोलीस उप आयुक्त, गुन्हे, श्री. अमोल झेंडे, मा. सहा पो आयुक्त, गुन्हे – १, पुणे, श्री. सुनिल तांबे यांचे मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक ०१ गुन्हे शाखा, पुणे शहर कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विनायक गायकवाड, सहा. पोलीस निरीक्षक, लक्ष्मण ढेंगळे, शैलजा जानकर, पोलीस अंमलदार, विशाल दळवी, पांडुरंग पवार, सचिन माळवे, मनोजकुमार साळुंके, विशाल शिंदे प्रविण उत्तेकर, संदिप शिर्के, राहुल जोशी, मारुती पारधी, सुजित वाडेकर, ज्ञानेश्वर घोरपडे, संदेश काकडे, नितेश जाधव, रेहाना शेख, योगेश मोहिते यांनी केली आहे.

Exit mobile version