आठ दिवसा पुर्वी बोपदेव घाटात डोक्यात दगड घालुन खुन करणा-या इसमास गुन्हे शाखेकडून अटक..!!

वर्तमान टाईम्स | वृत्तसेवा:- पोलीस अंमलदारास अजय थोरात यांना बातमीदाराकडुन बातमी मिळाली की, किरण थोरात यांने नेहमी त्याचे बरोबर फिरणारा मित्रास बोपदेव घाटात मारुन टाकले आहे व तो सध्या डांगे चौक चिंचवड येथे लपला आहे, अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने ती बातमी मा.वपोनि श्री संदीप भोसले गुन्हे शाखा युनिट १ पुणे यांना कळविली असता सदर इसमास ताब्यात घेवुन चौकशी करणेबाबत आदेश दिल्याने युनिट १ कडील पोलीस अधिकारी व अंमलदार डांगे चौक चिंचवड पुणे येथे जावुन काळा खडक वस्ती डांगे चौक वाकड पुणे या वस्तीमध्ये जात असताना बातमीदारांने वस्तीतील बोळामधुन चालत येत असलेला हाच तो किरण थोरात असा दाखविले किरण यास स्टाफच्या मदतीने ताब्यात घेण्यात आले व युनिट १ कार्यालयात आणुन त्याला विश्वासात घेवुन तपास करता त्याने सांगितले की, माझा नातेवाईक मयत नाव धनंजय हरिदास गायकवाड आमच्यामध्ये पैश्याचा कारणावरुन भांडणे झाली होती त्या कारणा वरुन तो मला जिवे ठार मारण्याची धमकी देत होता.

दिनांक १२/१२/२०२२ रोजी साय १७/३० वा सुमारास धनजंय गायकवाड हा दारु पिवुन माझे घरी आला व माझे आईला मला शिवीगाळ करुन मारुन टाकण्याची धमकी दिली. त्याने माझे घरावर दगड फेक केली म्हणुन मी त्यास गोड बोलुन झाले गेले विसरुन जा, मी तुला पैसे देतो, दारु पाजतो असे म्हणुन त्याने आणलेल्या दुचाकी वरुन त्याचेसोबत जावुन दारु खरेदी करुन बोपदेव घाट शेवटचा टोकला जावुन त्यास दारु पाजली, तो दारुच्या नशेत मला व माझ्या ३ महिन्याच्या मुलीला जिवंत जाळुन टाकेन अशी धमकी देवु लागला व तेथील दगड उचलुन माझ्या पाठीत मारला. तो मला व माझ्या मुलीस मारेल या भितीने मी तोच दगड घेवुन त्याच्या डोक्यात घातला तो डोक्यात वर्मी घाव लागल्याने खाली पडला, परत त्याच्या डोक्यात, छातीवर दगडयाचे घाव घालुन मारले, त्यामुळे तो तेथेच मेला. मी त्यास तेथुन ओढत नेवुन खाली दरीत ढकलुन दिले आणी त्याची गाडी ही ढकलुन दिली असे सांगुन त्याने कोंढवा पो स्टे गुरनं १२४४ / २०२२ भादवि कलम ३०२, २०१ या गुन्हा केल्याची कबुली दिल्याने आरोपी पुढील तपास करीता कोंढवा पोलीस ठाणचे ताब्यात देण्यात आला आहे.

सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त पुणे शहर श्री. रितेश कुमार, मा. सह, पोलीस आयुक्त, पुणे शहर श्री. संदिप कर्णिक, मा. अपर पोलीस आयुक्त गुन्हे, पुणे शहर श्री. रामनाथ पोकळे, मा. पोलीस उप-आयुक्त, गुन्हे पुणे शहर श्री. अमोल झेंडे, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे १, पुणे शहर श्री गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट १ कडील वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. संदीप भोसले, सहा पोलीस निरीक्षक आशिष कवठेकर, पोलीस उप-निरीक्षक सुनिल कुलकर्णी, पोलीस अमंलदार अजय थोरात, अमोल पवार, इम्रान शेख, राहुल मखरे, विठ्ठल सांळुखे, निलेश साबळे यांनी केली आहे.

Exit mobile version