अनाधिकृत प्रतिबंधीत चायनिज मांजा जप्त, गुन्हा दाखल गुन्हे शाखेकडून कारवाई..!!

वर्तमान टाईम्स | वृत्तसेवा:- चालु वर्षात मकरसक्रांतीच्या निमित्ताने बाजारात येणा-या प्रतिबंधीत चायनिज मांज्यामुळे पक्षांना, प्राण्यांना व मानवी जिवीतास तीव्र इजा होऊन अपघात घडणे, जिवीत हानी होऊ शकते. यावर प्रतिबंध करण्यासाठी मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर यांनी पुणे शहरात प्लॉस्टिक किंवा कुत्रिम पक्या धाग्या पासुन बनविलेल्या नॉयलॉन मांज्याच्या विक्रीवर कारवाई करणेकामी आदेशित केलेले आहे.

त्याप्रमाणे गुन्हे शाखाटयुनिट-५, कडील पथक युनिट कार्यक्षेत्रात पेट्रोलिंग करीत असतांना मिळालेल्या माहिती वरुन अब्दुल रहेमान पापा शेख, रा. स.नं. ५, गल्ली नं.३,आश्रफनगर, कोंढवा, पुणे याचे ताब्यातुन एकुण ८,०००/- रु किचा नॉयलॉन चायनिज मांज्याचे एकुण १५ रिल जप्त करुन त्याचेविरुध्द कोंढवा पोलीस ठाणे येथे गुन्हा रजि. नं. ३० / २०२३, भादंवि कलम १८८, ३३६, पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६चे कलम ५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

मा.पोलीस आयुक्त, पुणे शहर यांचेवतीने नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, आपल्या परिसरात कोणी अनाधिकृत प्रतिबंधीत केलेला चायनिज मांज्या विक्री करीत असल्यास तात्काळ पोलीसांना कळविण्यात यावे, जेणेकरुन पक्षी, प्राणी व मानवी जिवीतास हानी पोहचणार नाही.

सदरची कारवाई मा. पोलीस आयुक्त, श्री. रितेश कुमार, मा. सह पोलीस आयुक्त, श्री. संदीप कर्णिक, मा. अपर पोलीस आयुक्त, श्री. रामनाथ पोकळे, गुन्हे, मा. पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, श्री. अमोल झेंडे, मा. सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे – २, श्री. नारायण शिरगांवकर यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट-५ कडील पोलीस निरीक्षक, श्री. उल्हास कदम, पोलीस उप निरीक्षक, अविनाश लोहोटे, पोलीस अंमलदार, रमेश साबळे, दया शेगर, आश्रुबा मोराळे, शहाजी काळे, पृथ्वीराज पांडुळे यांनी केली आहे

Exit mobile version