अत्याचार पीडित गोपाल डाडर यांना मिळाली आरोग्य विभागात शासकीय नोकरी

एका जबाबदारीतून मुक्त झालो - वैभव गिते

वर्तमान टाईम्स | वृत्तसेवा :– दलित पॅंथर संघटनेच्या वर्धापनदिनी वालचंद नगर जंक्शन तालुका इंदापूर जिल्हा पुणे येथे वैभव तानाजी गीते यांनी जाती अत्याचारात खून झालेल्या 632 खून प्रकरणात पुनर्वसन करून दाखवेन अशी घोषणा केली होती.

ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत खून प्रकरणातील पीडित कुटुंबाच्या वारसास शासकीय नोकरी मिळावी व पुनर्वसन व्हावे म्हणून नॅशनल दलीत मुव्हमेंट फॉर जस्टिस (एन. डी.एम.जे) संघटनेने राज्य महासचिव ॲड.डॉ.केवलजी उके यांच्या मार्गदर्शनात शासनस्तरावर मोठ्या प्रमाणात पाठपुरावा सुरू होता.

या पाठपुराव्यास मिळालेले एक यश म्हणजे सहाय्यक आयुक्त समाजकल्याण अधिकारी राधाकीसन देवडे यांनी गोपाल डाडर यांना आरोग्य विभागात वर्ग 4 च्या पदावर नोकरी देण्याचे आदेश दिले आहेत. याबाबत सर्व नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टिस या संघटनेचे पदाधिकारी तसेच जेष्ठ विधीज्ञ बी.जी.बनसोडे यांनी जिल्हाधिकारी अहमदनगर व सहाय्यक आयुक्त समाजकल्याण अधिकारी राधाकिसन देवडे साहेब यांचे आभार मानले आहेत.

या पाठपुराव्यात राज्याचे विधी सल्लागार ॲड.अनिल कांबळे सहसचिव पी एस खंदारे, राज्य कोषाध्यक्ष शिवराम दादा कांबळे, राज्य संघटक पंचशीलाताई कुंभारकर,राज्य निरीक्षक बीपी लांडगे, राज्य सहनिरीक्षक दिलीप आदमाने,राज्य प्रसिद्धी प्रमुख प्रमोद शिंदे, राज्य व्यवस्थापक अंपल खरात, राज्य उपाध्यक्ष शरद शेळके, मुंबई ठाणे प्रदेशाध्यक्ष बंदिष सोनवणे, मुंबई ठाणे प्रदेश सचिव शशिकांत खंडागळे,ठाणे जिल्हा अध्यक्ष विजय कांबळे, मराठवाडा अध्यक्ष जगदीप दिपके यांची सुरेख साथ मिळाली असे वैभव गिते यांनी सांगितले.

Exit mobile version