अंमली पदार्थ विरोधी पथकाने छापा टाकुन १२ किलो १७० ग्रॅम गांजासह एकुण २,६८,४००/- रू किचा मुद्देमाल केला जप्त..!!

वर्तमान टाईम्स | वृत्तसेवा:- अंमली पदार्थ विरोधी पथक-२ कडील पोलीस निरीक्षक सुनिल थोपटे तसेच अंमलदार हे परिमंडळ-४ मधील लोणीकंद पोलीस ठाणेच्या परीसरात दिनांक २८/०२/२०२३ रोजी पेट्रोलींग करीत असताना, पोलीस अंमलदार, चेतन गायकवाड, रविंद्र रोकडे यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, एक व्यक्ती काळसर रंगाच्या अॅक्टीवा मोपेड वरुन नगर रोड येथे गांजा विक्रीकरीता येणार आहे.

मिळालेल्या बातमीनुसार अंमली पदार्थ विरोधी पथक -२, कडील अधिकारी पोलीस निरीक्षक, सुनिल थोपटे, पोलीस उप-निरीक्षक, एस. डी. नरके व पोलीस अंमलदार यांनी परीसरात सापळा लावला असता शिवशाही टुर्स अँड ट्रॅव्हल्स ऑफिस समोर वाघोली, पुणे येथे सार्वजनिक रोडवर एका काळया रंगाचे अॅक्टीवा मोपेड मधील पाय ठेवण्याचे मोकळया जागेत एक पांढ-या रंगाचे नायलॉन पोते घेवुन महादेव रामभाऊ खोडवे, वय- ३४, हा संशयितरित्या उभा असलेला दिसला. त्याचा संशय आल्याने त्यास ताब्यात

घेण्यात आले त्याची अंगझडती घेतली असता त्याचे ताब्यात असलेल्या मोपेड मध्ये एक पांढ-या रंगाचे नायलॉन पोत्या मध्ये एकुण २,६८,४००/- रु किचा ऐवज त्यामध्ये २,४३,४००/- रू किचा १२ किलो १७० ग्रॅम गांजा, १०,०००/- रु किचा मोबाईल फोन, १५,०००/- रु किची अॅक्टीव्हा मोपेड तसेच अंमली पदार्थ असा ऐवज अनाधिकाराने, बेकायदेशिररित्या, विक्रीकरीता जवळ बाळगताना मिळुन आल्याने, त्यांचेविरुध्द लोणीकंद पोलीस स्टेशन गु.र.नं. १७४ / २०२३ एन. डी. पी. एस. अॅक्ट कलम ८ (क), २० (ब) (ii) (ब) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

पोलीस उप-निरीक्षक एस. डी. नरके यांनी गांजा हा अंमली पदार्थ जप्त केला असुन, दाखल गुन्हयाचा तपास पोलीस उप-निरीक्षक, टेमगीरे, लोणीकंद पोलीस ठाणे पुणे शहर हे करीत आहेत.

सदरची कारवाई ही मा. पोलीस आयुक्त, श्री. रितेश कुमार, मा. सह पोलीस आयुक्त, श्री. संदिप कर्णिक, मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, श्री. रामनाथ पोकळे, मा. पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, श्री. अमोल झेंडे मा. सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे – २, श्री. नारायण शिरगावकर यांचे मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक -२, गुन्हे शाखा, पुणे शहर कडील पोलीस निरीक्षक, सुनिल थोपटे, पोलीस उप- निरीक्षक, एस. डी. नरके, पोलीस अंमलदार, संतोष देशपांडे, चेतन गायकवाड, संदिप जाधव, रविंद्र रोकडे, साहिल शेख, संदिप शेळके, नितीन जगदाळे, आझीम शेख, दिशा खेवलकर, दिनेश बास्टेवाड यांनी केली आहे.

Exit mobile version