अहमदनगर,दि.22 :- रिपब्लिकन सेनेचे महाराष्ट्र सदस्य आणि अहमदनगर जिल्हा निरीक्षक आयु. शशिकांत कांबळे यांच्या उपस्थितीत आढावा बैठक संपन्न झाली. तसेच अनेक भिम सैनिकांचा पक्ष प्रवेश करून त्यांना पदभार सोपवण्यात आला आहे.
रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष मा. आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या आदेशानुसार अहमदनगर व नाशिक जिल्हा निरीक्षक पदाची आयू. शशिकांत कांबळे यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे. आपल्या दिलेल्या आदेशानुसार शशिकांत कांबळे यांनी काल दि. 21 रोजी अहमदनगर शासकीय विश्रामगृह येथे आढावा घेतली सदर बैठकीस मोठा उत्साहात स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते यांची उपस्तिती होती. भविष्यातील निवडणूक व प्रामुख्याने पक्षवाढ संदर्भात या बैठकीत चर्चा करण्यात आली आहे.
बैठकीस आयु. मुकुंद रंधवे पुणे आयु.सचिन आहिरे युवा अध्यक्ष पुणे सुहास वाघमारे पुणे आकाश गायकवाड पुणे मुसा पटेल पत्रकार श्रीरामपुर सह जिल्हा प्रमुख राजुभाऊ आढाव जिल्हा महासचिव अशोक गायकवाड जिल्हा संघटक कुंदन तुपेरे जिल्हा उपप्रमुख कल्याण रंधवे महिला आघाडी जिल्हा प्रमुख वैशाली ताई गायकवाड उपप्रमुख चित्राताई तांबे पाथर्डी ता.प्रमुख बाबासाहेब रंधवे नवनिर्वाचित ता.प्रमुख शहादेव रंधवे शेवगाव ता.प्रमुख वसंत साबळे जामखेड नवनिर्वाचित ता. प्रमुख सुनिल नंदिरे नेवासा तालुका संघटक अंबादास गाढे अपंग सेल ता.प्रमुख देवीदास गाढे राहूरी ता.उपप्रमुख भानुदास जाधव तालुका संघटक भाऊ पवार श्रीरामपुर तालुका संघटक संजय अमोलिक पाथर्डी विद्यार्थी सेना ता.प्रमुख गणेश रंधवे जामखेड तालुका उपप्रमुख बबन गव्हाळे महासचिव राहुल समुद्र सह अजित तांबे विशाल खरात उत्तम बरडे भगवान रंधवे दिपक अमोलिक महिला आघाडी नेवासा ता.प्रमुख सुमन ताई पंडित नंदाताई पंडित लता कांगोणे मंगल वडागळे सविता ताई जाधव सरचिटणीस सरला ताई गायकवाड जया ताई ढगे खजिनदार विजया ताई कांगोणे सह इतर अनेक भीम सैनिक उपस्थित होते.
त्या वेळी जामखेड ता प्रमुख पदि सुनिल नंदिरे व महासचिव पदि राहुल समुद्र यांचि तर शहादेव रंधवे यांची पाथर्डी ता.प्रमुख व वैशालीताई गायकवाड जिल्हा प्रमुख महिला आघाडी तर चित्राताई तांबे यांचि जिल्हा उपप्रमुख पदी निवड करण्यात आली.
जिल्हा प्रमुख राजुभाऊ आढाव यांनी आपल्या आजपर्यंतच्या कामाचा लेखाजोखा सादर केला. तसेच भविष्यात संघटण वाढविण्यासाठी काय करायचं याविषयी मार्गदर्शन केले. महासचिव अशोक गायकवाड यांनी प्रस्तावना करूण आलेल्या मान्यवरांचे स्वागत केले. आयु.मुकुंद रंधवे सचिन आहिरे युवा शहर प्रमुख सह वसंत साबळे ता.प्रमुख शेवगाव कल्याण रंधवे जिल्हा उपप्रमुख राहुल समुद्र महासचिव जामखेड वैशालीताई गायकवाड जिल्हा प्रमुख महिला आघाडी तर चित्राताई तांबे जिल्हा उपप्रमुख महिला आघाडी आदि मान्यवरांनी आप आपले मनोगत व्यक्त केले.व शेवटी शशिकांत कांबळे साहेब महाराष्ट्र सदस्य व निरीक्षक अहमदनगर जिल्हा यांनी भविष्यात पक्ष वाढवणे साठी कसे काम करावे या विषयी मनोगत व्यक्त केले.
आलेल्या सर्व मान्यवरांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले व निरीक्षक साहेब यांचे समवेत सर्व जिल्हा पदाधिकारी व तालुका पदाधिकारी यांच्या एकमताने पक्ष हितासाठी काही ठरावही करण्यात आले आहे.