परप्रांतीय गांजा विक्री करणा-यांना चंदननगर पोलिसांनी ठोकल्या बेड्या

पुणे, निर्भीड वर्तमान:- चंदननगर तपास पथकातील अधिकारी व अंमलदार हे चंदननगर पोलीस स्टेशन हदीत पेट्रोलिंग करत असताना पोलीस अंमलदार नामदेव गडदरे, सुभाष आव्हाड यांना त्यांच्या बातमीदारामार्फत दोन व्यक्ति नागपाल रोड, चंदननगर पुणे येथे गांजा विकणेसाठी येणार आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाली होती.

मिळालेली बातमी आपल्या वरीष्ठांना कळवुन त्यांच्या आदेशा प्रमाणे तात्काळ पोलिसांची टिम रवाना होवुन त्यांना मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी पोहचुन आडबाजुला दबा धरून बसले व पाहणी करत असताना सायंकाळचे सुमारास बातमीतील वर्णनाचे दोघे जन पोलिसांना संषईत रीत्या आढळयाने पोलीसांनी त्यांना जागीच पकडले त्यांची प्रवासी सॅकबॅग तपासली असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणात गांजा मिळून आला आहे.

गांजा विक्री

यामधील आरोपी सागर कुमार वय २३ वर्षे, रा. ग्राम गोरीडी,राज्य-उत्तर प्रदेश व शिवम सरोज वय २२ वर्षे, यांना पुढील कारवाई कामी चंदननगर पोलीस स्टेशनला आणुन त्यांचे विरूद्ध चंदननगर पोलीस स्टेशन गुन्हा नोंद करण्यात आला आहे. त्यांचेकडे एकुण पावणेतीन किलो गांजासह मोबाईल व इतर असा एकुण ६९,४००/- रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

सदरची कारवाई मा. पोलीस उप आयुक्त, परि.४ श्री. विजयकुमार मगर, मा. सहा. पोलीस आयुक्त येरवडा विभाग श्री. संजय पाटील यांचे मार्गदर्शनाखाली मा. वरीष्ठ पोलीस निरीक्षक चंदननगर पो.स्टे. पुणे शहर, श्रीमती मनिषा पाटील, सहा. पोलीस निरीक्षक प्रशांत माने, पोलीस उपनिरीक्षक अरविंद कुमरे, पोलीस अंमलदार महेश नाणेकर, नामदेव गडदरे, सुभाष आव्हाड, विकास कदम, दिलावर सय्यद, श्रीकांत शेंडे, अविनाश संकपाळ, सचिन रणदिवे, विष्णु गोणे, सचिन कुटे, शिवाजी धांडे, श्रीकांत कोद्रे, सुरज जाधव, गणेश हांडगर, शेखर शिंदे, यांनी केलेली आहे.

Exit mobile version